मेक्सिको मेट्रोचा एक पुल कोसळून मोठा अपघात, 23 ठार शेकडो जखमी
0
मेक्सिको सिटी मेट्रोचा एक पुल कोसळून मोठा अपघात झाला आहे. दुर्घटना घडली त्यावेळेला मेट्रो ट्रेन त्या पुलावरून जात होती. या अपघातात सुमारे २३ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. यात अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. मेट्रोचा पूल खाली रस्त्यावर कोसळला.
स्थानिक मीडियाने प्रसारित फुटेजमध्ये ट्रेनची बोगी सुरक्षा कॅमेऱ्याच्या पुलाच्या खाली कोसळताना दिसत आहे. या अपघातात ट्रेनच्या काही भागा नुकसान झाले आहे. घटनेची माहिती समजताज अग्निशमन दल व आरोग्य पथकाने घटनास्थळी धाव घेत बचाव कार्यास केली.