📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

आज जिल्ह्यात 18ते 44 वयोगटातील 276 जणांचे लसीकरण

कोविड १९ लसीकरण

जागतिक पातळीवर कोरोना प्रादुर्भाव वाढत असतांना दि १६/०१/२०२१ पासुन देशात सर्वत्र कोविड १९ लसीकरण मोहिमेस सुरुवात झाली आहे.

प्रथमत: आरोग्य कर्मचारी यांना कोविड १९ लसीकरणासाठी नाशिक जिल्हयातील पूर्व नियोजित १३ संस्थांमध्ये लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. दि ०१/०४/२०२१ अखेर आरोग्य कर्मचारी यांचा पहिला डोस ६५६८८ तसेच यापैकी २९०७२ कर्मचाऱ्यांचा दुसरा डोस पुर्ण करण्यात आला.

दुसऱ्या टप्यात Frontline Worker यांचे लसीकरण हे केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सुरु करण्यात आले. दि ०१/०५/२०२१ अखेर Frontline Worker यांचा पहिला डोस ५७९०९ तसेच यापैकी २१९७६ कर्मचाऱ्यांचा दुसरा डोस पुर्ण करण्यात आला.

तिसऱ्या टप्यात मार्गदर्शक सुचनांनुसार प्रथमतः वय ४५ ते ५९ वर्ष Comorbid व ६० वर्षावरील वयोगट असणारे यांचे लसीकरण करण्यात आले. नंतर शासनाच्या फेर मार्गदर्शक सुचनानुसार ४५ ते ५९ वर्ष वयोगटातील सर्वच लाभार्थ्याचा लसीकरणामध्ये समावेश करण्यात आला. ४५ ते ५९ वर्ष वयोगटातील दि ०१/०५/२०२१ अखेर पहिला डोस २४९२३५ तसेच यापैकी २९५६६ लाभार्थ्याचा दुसरा डोस पूर्ण करण्यात आला. तसेच ६० वर्षावरील वयोगटातील पहिला डोस २२८२७१ तसेच यापैकी ४४१८८ लाभार्थ्याचा दुसरा डोस पुर्ण करण्यात आला.

अशा प्रकारे जिल्हयात दि ०१/०५/२०२१ अखेर आरोग्य कर्मचारी, Frontline Worker, ४५ ते ५९ वर्ष व ६० वर्षावरील वयोगट एकुण ६०११०३ लाभार्थ्यांना पहिला डोस व १२४८०२ दुसरा डोस देण्यात आला. या सर्व लसीकरण मोहिम राबवत असताने शासकिय व खाजगी असे एकूण ३०० लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आलेले आहे.

आज दि. ०१ मे २०२१ रोजी केंद्र व राज्य शासनाच्या सुचनांनुसार जिल्हयात १८ ते ४४ वर्ष वयोगटातील लसीकरण सुरु करण्यात आले. जिल्हयात ग्रामीण भागातील एकूण दोन लसीकरण केंद्र प्रा.आ.केंद्र मोहाडी, प्रा आ. केंद्र पिपळगाव व तसेच नाशिक मनपा कार्यक्षेत्रातील इंदिरा गांधी हॉस्पिटल व श.आ.केंद्र नाशिक रोड आणि मालेगाव मनपा कार्यक्षेत्रातील श.आ.केंद्र निमा २ अशा प्रातिनिधिक एकुण पाच ठिकाणी लसीकरण करण्यात आले. सर्व लसीकरण केंद्रांना प्रत्येकी २००० डोस लसीचे पुरविण्यात आले. सदरील लसीकरण केंद्र पुढील सात दिवस कार्यन्वियीत ठेवण्याच्या सुचना राज्यस्तरावरून प्राप्त आहे.
आज १८ ते ४४ वर्ष वयोगटाचा लसीकरण मोहिमेचा पहिला दिवस असल्याने व Self Registration online Book npulsory केल्याने लाभार्थ्यांचा दुपारी २ वाजेनंतर Slot Book झाला. त्यामुळे लसीकरणासाठी अर्ध्या दिवसाचा लसीकरणाला वेळ मिळाला. आज प्रायोगिक तत्वावर पाचही लसीकरण केंद्रांना प्रत्येकी १०० लाभार्थ्याचे उदिदष्ट देण्यात आले होते. आज सर्व लसीकरण केंद्र मिळून एकूण २७६ लाभार्थ्याना लसीकरण करण्यात आले.

नाशिक मनपा कार्यक्षेत्रातून लसीकरणास चांगला प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागात अल्प प्रतिसाद मिळाला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने