📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

हे वाचा तुमचा आजार असाच पळून जाईल ❤

भीती काय करू शकते???
भीती जीव घेऊ शकते का ???

भीतीमुळे मनुष्याच्या शरीरात वेगळे काही बदल होऊन मनुष्य मरणाच्या दारापर्यंत जाऊ शकतो का??
ह्या गोष्टींचा विचार करण्याची वेळ आहे.
विषादो रोगवर्धनानां।
हे काहीतरी सांगायचं म्हणून सांगितलेल सूत्र नाही. विषाद म्हणजे दुःख आणि दुःखाने रोगप्रतिकारक क्षमता कमी होते व रोगाची ताकद वाढते.
रोगप्रतिकारक क्षमता कोणाची कमी असते हे सांगताना 'अल्प सत्वानि' म्हणजेच मनाने कमकुवत आहे त्याची असं सांगितले आहे.

चक्रदत्त म्हणतात भीरुतस्यरोगकर्तुत्वात
साध्या भाषेत अर्थ, घाबरणार्याला रोग होतो.

दुषित पाण्यातून, खराब अन्नातून, खराब हवेतून रोग मोठ्या प्रमाणात पसरतो किंवा वाढू शकतो किंवा या गोष्टीतून माणूस मरणाच्या दारात पोचू शकतो. पण याहीपेक्षा सगळ्यात मोठं कारण म्हणजे विषाद सांगितलेला आहे. रोग वाढवणार्या सगळ्या कारणांमध्ये श्रेष्ठ कारण हे विषाद आहे.

जोपर्यंत कुठले रिपोर्ट पॉझिटिव्ह येत नाहीत. आजाराचा शिक्कामोर्तब होत नाही तोपर्यंत व्यवस्थित असणारे रुग्ण आजाराचा शिक्कामोर्तब झाल्यानंतर शरीराने खंगायला लागतात हे व्यवहारात दिसते.

मनाचा आणि शरीराचा अत्यंत जवळचा संबंध आहे आयुर्वेदामध्ये शोकज अतिसार, भयज अतिसार अशे आजार सांगितलेले आहेत. म्हणजेच भीतीतून उत्पन्न तीव्र जुलाब.

विचार करा मनाचा व शरिराच्या संबंधाचा.

डॉक्टर तुमच्याकडे आलं ना की तुमच्या शब्दांनीच अर्धा आजार बरा होतो असे रुग्ण बोलतात हे तुम्ही पाहिल असेल. का हो अस ते बोलत असतील??

मोठ्या प्रमाणात गुडघेदुखी असणारे रुग्ण एखाद्या देवस्थानाला जाऊन येतात आणि म्हणतात जाता येताना अजिबात गुडघे दुखीचा त्रास जाणवला नाही. काय आहे हि मनाची ताकद जी शरीराच्या एवढ्या वेदना विसरायला लावते ??

मनाच्या ताकतीचा वापर आपल्याला करता कसा येईल त्याचा विचार करायला हवा. मन हे शरीररुपी रथाच सारथ्य करतं.

म्हणजे एखाद पिल्लू जर आपण मनात सोडलं तर ते शरीर मोठ व्हायला वेळ लागत नाही.

आपल्याला काय झालं आहे एखाद्या बॅक्टेरिया मुळे, एखाद्या बाहेरील जंतूंमुळे आजार होतो इथपर्यंतची समीकरण मनाला पटतात परंतु एखाद्या भीतीमुळे मनुष्य मृत्यूच्या दारापर्यंत जाऊ शकतो हे समीकरण तितकस मनाला पटत नाही.

Thanatophobia

हा एक असाच प्रकारचा आजार आहे त्याच्यामध्ये मनुष्याला मृत्यूची भीती वाटते.

आजार जरी मानसिक असला तरी चक्कर येणे, घाम येणे छातीत धडधडणे, पोट बिघडणे अशी शारीरिक लक्षणे पराकोटीची होऊ शकतात. जर त्या आजारावर योग्य उपचार झाले नाहीत तर सततची भीती, पराकोटीच्या भावना यामुळे अड्रेनालीन सारखे केमिकल शरिरामध्ये मोठ्या प्रमाणात तयार होते. वाढलेल्या अड्रेनालीनमुळे हृदयाच्या ठोक्यांमध्ये अनियमितता होऊन ह्रदय रोगाने माणूस मरू शकतो.

आपल्याला 'विषाद' पेक्षा अड्रेनालीन लवकर कळतं म्हणून सांगण्याचा हा प्रयत्न.

मानसिक आजाराच्या चिकित्सा ह्या मनोधैर्य वाढवणे, आश्वासनात्मक बोलणे, आजाराची भीती न घालणे, सतत सकारात्मक विचार बिंबवणे, जगण्याची उमेद निर्माण करणे अशा पद्धतीच्या व्हायला हव्यात. हे सोडून वेगवेगळ्या प्रसार माध्यमातून सतत मृत्यूच्या आकडे सांगणे, भीतीवर भीती, नकारात्मक संदेश या गोष्टीमुळे नक्कीच कुठल्याही आजारावर आपल्याला विजय मिळवता येणार नाही.

Assurance is the first line of treatment तुला काही झाले नाही, तू बरा होणार आहेस, हा रोग तुझ्यासमोर

काहीच नाही, बघ किती लोक बरे झाले आहेत. बघ बरी झालेल्यांची आकडेवारी हे शब्द फार गरजेचे आहेत कारण ही चिकित्सा आहे ज्याला चरकाचार्य अद्रव्यचिकित्सा म्हणतात आणि विमान स्थानात याला औषधाच स्थान दिलेल आहे.

धातू मल, दोष याबरोबरच मनाचं वैषम्य पण दूर करणं हे वैद्याचा आद्यकर्तव्य आहे.

प्रत्येकाने आपली सदसद्विवेकबुद्धी जागृत
इतक्यात मरण्यासाठी जन्मलो नाही आहोत.
ठेवा. आपण जगण्याची प्रचंड इच्छाशक्ती तुम्हाला कधीच मरून देणार नाही. नुसता शरीर पोलादी करू नका मनालाही पोलादी बनवा.

नकारात्मक लोकांपासून लांब रहा.
नकारात्मक शब्द कानावर पडून देऊ नका. चांगल्या गोष्टीत मन रमवा.

आयुर्वेदिय दिनचर्या जाणून घ्या कारण

समदोष: समाग्निश्च समधातुमलक्रिय, प्रसन्न आत्मेन्द्रिय मना स्वस्थ इति अभिधीयते ।

यामध्ये मन आणि आत्म्याच स्वास्थ्य जर चांगलं नसेल आणि शरीर कितीही चांगलं असलं तरी तो माणूस हा रोगी म्हणून सांगितलेला आहे.

वेळीच सावध व्हा!

विवेकशून्य सारखे वागू नका जीवन हे अनमोल आहे. योग्य चिकित्सेची निवड करा.
डॉ. मानसी पाटील..

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने