📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

दोंडाईचा पोलीस ठाण्यावर जमावाचा हल्ला

दोंडाईचा (प्रतिनिधी) काल रात्री धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे काही व्यक्तीने थेट पोलिस ठाण्यावर हल्ला करून आरोपीला पळून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे, यावेळी जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन जण जखमी झाले तर दोन गटात हाणामारी एकाचा मृत्यू झाला आहे

याबाबत वृत्त असे की दोंडाईचा येथे काल  आपल्या काकूची वाट पाहत असेल अल्पवयीन मुली कडे संशयित आरोपी तुया उर्फ शफिक शेख तसेच त्याच्या बरोबर असलेल्या कैसर व इमाम शेख यांनी मुलीकडे बघून अश्लील हावभाव केले, त्यानंतर पीडित मुलीने याबाबत आपल्या भावाला सांगितले भावाने सदर आरोपींना चोप दिला त्यानंतर दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली त्यानंतर पोलिसांनी सदर आरोपींना पॉस्को कायद्यांतर्गत अटक करून पोलीस स्टेशनमध्ये आणले,परंतु या अटकेचा विरोध करत सदर आरोपींकडून आलेल्या जमावाने पोलीस कर्मचारी व अधिकार्‍यांवर दडपण आणत उचलत घालण्याचा प्रयत्न करत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर चाल केली यात पोलिस अधिकारीही जखमी झाले आहे व पोलीस ठाण्यावर तुफान दगडफेक करत चालून आले यावेळी पोलिस ठाण्याचे निरीक्षक वारे यांनी जमावाला पांगविण्यासाठी गोळीबार करण्याचे आदेश दिले पोलिसांनी दोन फैरी झाडल्या नंतर या जमावातील लोक पळून गेले मात्र यामध्ये बिलाल युनुस खाटीक व आणखी एक जण जखमी झाला असल्याचे समजते या जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर या दोन गटांच्या हाणामारी मध्ये अब्बास शाह याचा मृत्यू झाला सध्या परिसरात तणावाचे वातावरण असल्याने नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दिघावकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी दोंडाईचा येथे दाखल झाले आहे



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने