📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

वाखारी व दहिवड येथे ग्रामपंचायत प्रशासनाचा जनता कर्फ्युचा निर्णय

देवळा (कसमादे मिडिया न्युज नेटवर्क) देवळा शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत असून, फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्या पासून पुन्हा रुग्ण संख्येत वाढ झाल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.
या वाढत्या रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी वाखारी येथे ( दि.३०)मार्च रोजी ग्रामपंचायत पदाधिकारी ,ग्रामस्थ व व्यापारी वर्गाच्या बैठकित (दि.१ ते ४ एप्रिल पर्यंत जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
  यावेळी गावातील सर्वांनी नियमाचे पालक करण्याचे आवाहन करण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना व्यावसायिकांना २१०० रु दंड व विना मास्क दिसल्यास २०० रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे.
याप्रसंगी सरपंच राहुल पवार ,उपसरपंच डॉ संजय शिरसाठ , ग्रामविकास आधिकारी निंबा सुर्यवंशी ,ग्रामपंचायत सदस्य नितीन ठाकरे ,रमेश खरे ,व्यापारी वर्ग ,व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
₹ दहिवडला आठ दिवस जनता कर्फ्यु
दरम्यान , तालुक्यातील दहिवड गावात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ग्रामपंचायतीच्या वतीने बुधवारपासून (दि ३१ मार्च ते ८ एप्रिल प्रयन्त जनता कर्फ्यु घोषित करण्यात आला आहे . अशी माहीती सरपंच आदिनाथ ठाकूर यांनी दिली .
दहिवड येथे सर्वाधिक १६७ कोरोना बाधित रुग्ण असून ,आतापर्यंत पाच बंधितांचा मृत्यू झाला आहे . यामुळे गावात दहशतिचे वातावरण पसरले आहे . याची साकळी तोडण्यासाठी गावांत आठ दिवस जनता कर्फ्यु घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . या काळात अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम २५ अनव्ये जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार दहिवड ग्रामस्थ व सर्व व्यवसायिक यांनी नियमांचे काटेकोर पणे पालन करावे अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असे आवाहन सरपंच आदिनाथ ठाकूर , पोलीस पाटील , ग्रामविकास अधिकारी यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने