राशन कार्डधारकांनो जाणून घ्या, तुम्हाला किती मिळते राशन 'या' नव्या मोबाइल ॲपवर
दिल्ली | केंद्र सरकारकडून राशन कार्ड धारकांसाठी भारतामध्ये 'मेरा राशन' नावाचे मोबाईल ॲप तयार केले असून, त्याची लाँचिंग देखील केली आहे. या ॲपमध्ये गरीब कुटुंबातील गरजू नागरिकांना आपल्या धान्याची फेअर प्राईस शॉप जाणून घेता येईल. त्यासह रेशन कार्ड मध्ये आपली सद्यस्थिती तसेच रेशन कार्डातील सर्व माहिती कळू शकणार आहे. 'मेरा राशन' हे मोबाईल ॲप अँड्रॉइड स्मार्टफोनसाठी उपलब्ध असणार असणार आहे. त्यामुळे युजर्स हे त्याला गुगल प्ले स्टोरवरून सहज डाउनलोड करू शकतात. भारतातील स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या कोटींमध्ये आहे. त्यामुळे मोबाइलवर सरकारी योजना आणि त्यांचा मिळणारा लाभ याची पूर्ण माहिती हर एक कुटुंबाला एका क्लिक मिळू शकते.
लवकरच देशातील इतर 14 भाषेत होणार उपलब्ध :
देशाच्या 'राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा' (NFSA) च्या माहितीनुसार, रेशन कार्ड धारकांना लाभासाठी Public Distribution System (PDS) ही सिस्टीम लागू केली आहे. याद्वारे कार्डधारकांना केवळ १ रुपये ते ३ रुपये प्रति किलोग्रॅम याप्रमाणे धान्य मिळत असते. जवळपास या सुविधेचा लाभ भारतातील ३२ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील करोडो लोकांना होत असतो. नव्या 'मेरा राशन' ॲपमुळे लोकांचा अधिकच फायदा होणार आहे. लॉन्चिंगवेळी हे ॲप हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषेत उपलब्ध आहे. परंतु, देशातील इतर 14 भाषेत देखील लवकरच येणार आहे.
असा करा ॲपचा उपयोग :
'मेरा राशन' हे मोबाईल ॲप हाताळण्यास हाताळण्यास अगदी सोपे आहे. सर्वात प्रथम तुम्ही ते गुगल प्ले स्टोर डाऊनलोड करून घ्यावे. गुगल प्ले स्टोरवर तुम्हाला Central AEPDS Team द्वारा डिवेलप केलेले ॲप उपलब्ध होईल. डाउनलोड करून झाल्यानंतर तुम्हाला त्यात आपला मोबाइल नंबर रजिस्टर करावा लागेल, मोबाईल नंबर रजिस्टर झाल्यानंतर तुमचे रेशन कार्ड नंबर मागितले जाईल. नंबर टाकल्यानंतर सबमिट करा. मग राशन कार्ड संबंधी सर्व माहिती मिळू शकेल. या ॲपवर मागील सहा महिन्याचे ट्रान्झॅक्शन आणि आधार सीडिंगची संपूर्ण माहिती तुम्हाला तुमच्या मोबाइलवर मिळवता येऊ शकते.
