📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

नेमेचि येतो पावसाळा: नेहमीची दैना सोयगावची

सोयगाव; मालेगाव शहरातील एक महत्त्वाचा भाग, गेल्या दोन दशकात या भागात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली, पूर्व भागातील हिंदू स्थलांतरित होऊन पश्चिम भागात वसु लागले,
वाटेल तिथे प्लॉट पडू लागले,नागरिकांनीही मागचा पुढचा विचार न करता बेधडक बांधकामे सुरू किनी मधल्या काळात महानगरपालिकेत समाविष्ट होण्याच्या आधी सोयगाव मध्ये ग्रामपंचायत अस्तित्वात होती त्यामुळे कुठल्याही प्रकारचे टाऊन प्लॅनिंग सोयगाव नववसाहत भागात सुद्धा दिसून येत नाही, त्यामुळे भागात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाणी साठवण्याच्या प्रमाण दिसून येते, बेसुमार बांधकाम, अरुंद रस्ते आणि त्यातच नैसर्गिक नाल्यांचा विचार न करता सरसकट भराव करून बांधकामे आटोपली, त्यामुळे नाल्यांद्वारे वाहून जाणारे पाणी आता विविध भागात साचण्यास सुरुवात झाली आहे, वेळोवेळी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊन सुद्धा योग्य ती कार्यवाही न झाल्याने प्रत्येक वर्षी नव वसाहत भागात पावसाळ्यात पाणी साचते, परिणामी घरांमध्येही पाणी शिरून नागरिकांचे हाल होतात, शिवाय आबालवृद्धांची, वाहनधारकांची त्रेधातिरपीट उडते, महापालिकेकडून नही योग्य नियोजन नसल्याने गटार करून सुद्धा या भागात साचणारे पाणी बाहेर निघू शकत नाही यासाठी गांभीर्याने विचार करून प्रशासनातर्फे कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे याबाबतीत महापालिकेने अंडरग्राउंड गटारांची व्यवस्था केल्यास प्रश्न सुटण्यास मदत होईल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने